‘रेमडेसिविर’संदर्भातील भाजपचा दावा खोटा ? मंत्री राजेंद्र शिंगणेंचा मोठा खुलासा

मुंबई : रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची परवानगी घेतल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, शिंगणे यांनी भाजपचा दावा फेटाळून लावत या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा व साठा यावरून उलट सुलट तर्क लावले जात आहे. यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे, असं मंत्री शिंगणे यांनी म्हटलं आहे.  कुठलाही पक्ष हा वैयक्तिकरित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही. त्यांना तो सरकारला द्यावा लागतो. भारतीय जनता पक्ष रेमडीसीविर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र हे सपशेल चुकीचं आहे.

कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिकरित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही. ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील. भाजपकडून माझ्या नावाचा अपप्रचार करण्यात येत असून त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे, असं मंत्री शिंगणे यांनी स्वत: च्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.