‘नगर’मध्ये करोनाचा हाहाकार; बाधितांचा एक लाखाचा टप्पा पार

एकाच दिवसात आढळले तब्बल 'एवढे' रुग्ण

नगर  – नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा नवा उच्चांक झाला आहे. आज दिवसभरात तब्बल 1 हजार 996 नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख पार झाली आहे. जिल्ह्यात करोनाचा एक प्रकारे विस्फोटच झाला असून, नगरकरांसाठी धोक्याची घंटाच असल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात हाजारांच्या पुढे करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहेत.

जिल्ह्यात आज 1 हजार 228 रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 89 हजार 701 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.67 टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 9 हजार 98 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 823, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 902 आणि अँटिजेन चाचणीत 271 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 212, अकोले 3, जामखेड 75, कर्जत 16, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 26, नेवासे 10, पारनेर 49, पाथर्डी 85, राहता 53, राहुरी 6, संगमनेर 97, शेवगाव 39, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 54,  कँन्टोेन्मेंट बोर्ड 30, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि  इतर जिल्हा 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 228, अकोले 4, जामखेड 12, कर्जत 8, कोपरगाव 148, नगर ग्रामीण 58, नेवासे 19, पारनेर 5, पाथर्डी 28, राहाता 134,  राहुरी 38, संगमनेर 57, शेवगाव 14, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 111, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1, इतर जिल्हा 16 आणि इतर राज्य 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज 271 जण बाधित आढळून आले. मनपा 36, अकोले 21, जामखेड 7, कर्जत 1, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 9, नेवासे 28, पारनेर 11, पाथर्डी 28, राहाता 8, राहुरी 35, शेवगाव 16, श्रीगोंदा 24 आणि श्रीरामपूर 28, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 354, अकोले 39, जामखेड 47, कर्जत 59,  कोपरगाव 89, नगर ग्रामीण 37, नेवासे 52, पारनेर 35, पाथर्डी 39, राहाता 126, राहुरी 82, संगमनेर 84, शेवगाव 22, श्रीगोंदा 33, श्रीरामपूर 79, कॅन्टोन्मेंट 29 आणि इतर जिल्हा 22, अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्णसंख्या : 89701
उपचार सुरू असलेले रुग्ण : 9098
मृत्यू : 1238
एकूण रुग्णसंख्या : 1,00,037

2 लाख 18 हजार 641 व्यक्तींनी घेतली लस
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात 2 लाख 18 हजार 641 जणांना करोनाची लस देण्यात आली आहे. त्यात आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, महसूल, पोलीस, पंचायतराज, रेल्वे आदी विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्याच बरोबर 45 वर्षांपुढील नागरिकांचा समावेश आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.