#Lifestyle: नखांची देखभाल आणि सौंदर्य

आपल्या हातापायांच्या बोटांना नखे ( Healthy Nails )  असतात. आणि ती नेहमी वाढत असतात. वेळच्यावेळी नखे कापणे, त्यांना योग्य तो आकार देणे, त्यांची देखभाल करणे आवश्‍यक आहे. सौंदर्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. आपली नखं आपल्या आरोग्याचा आरसा असतात. वैद्यक शास्त्रात नखांची परीक्षा केली जाते. म्हणूनच नखांना स्वच्छ ठेवणं व त्यांची काळजी घेणं खूप आवश्‍यक आह. नखात अडकलेली घाण जेवताना, काही खाताना आपल्या पोटात जाऊ शकते. शिवाय वेडीवाकडी वाढलेली नखे दिसायला तर वाईट दिसतातच, पण जर काही काम करताना नखांमुळे व नखांनाही इजा होण्याची शक्‍यता असते. तेव्हा नखांची देखभाल आवश्‍यक आहे, यात दुमत नसावे. त्यासाठी काही सहजसोपे उपाय-

1) आहारात सर्व पोषकतत्त्वांचा समावेश असावा कारण हाच आहार नखांच्या संरचनेत मुख्य भूमिका निभावतो.
2) नखांना लिंबाची सालं किंवा रसाने मालिश करा आणि काही वेळानंतर धुवून टाका. यामुळे नखांवर असलेले डाग निघून नखे स्वच्छ व चमकदार होतील.
3) गरम पाण्यात थोडे मीठ टाकून त्यात आपल्या नखांना कमीत कमी 5 मिनिटे. बुडवून ठेवा. नंतर नखांना स्वच्छ पुसून व्हॅसलीनने मसाज केल्यास रक्ताभिसरण चांगले होईल व नखे फ्रेश दिसतील.
4) सतत नेलपॉलिश लावू नका. नखं थोडाकाळ मोकळीही असायला हवी. नखांनाही मोकळा श्‍वास घेऊ द्या. नेलपेंटमध्ये असलेल्या केमिकल्समुळे नखं ( Healthy Nails ) पिवळी होतात.
5) रात्री झोपायच्या आधी चांगल्या तेलाने हातांची आणि नखांची मालिश करून घेतल्याने नखं मजबूत राहतात.
6) पाण्यात बेकिंग सोडा घाला आणि 15 मिनिटे त्यात हात बुडवून ठेवा. नंतर टूथब्रश अथवा नेलब्रशच्या साहाय्याने नखांतील मळ काढून टाका. बाहेरील. नंतर कॉटन कपड्याने हात स्वच्छ पुसून घ्या.
7) नखे अगदी नियमितपणे कापून नेल फाईलने स्वच्छ करा.
8) नेलपेंट लावण्याआधी नेलहार्डर लावावे म्हणजे नखे केमिकल्सपासून सुरक्षित राहतात.
9) खोबरेल तेलात मध आणि मेंदीचं तेल मिसळून गरम करावं. तेल कोमट झाल्यावर त्यात नख बुडवून ठेवावी. 10 मिनिटे तरी नख तेलात असू द्यावी. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा

सुंदर, आकर्षक नखं हाताचं सौंदर्य अधिक खुलवतात. मात्र अनेकदा काही कारणांमुळे नखं पटकन तुटण्याची भीती असते. असे काही पदार्थ आहेत ज्याचं सेवन केल्यास नखं मजबूत होण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.

मजबूत आणि सुंदर नखांसाठी प्रोटिन्सची अत्यंत आवश्‍यकता असते. मासे हे प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहेत. केवळ नखांसाठी नाही तर शरीरासाठी प्रोटिन्स अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे आपल्या आहारात माशांचा समावेश नक्की करा.

अंड्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, बायोटिन यांसारख्या पोषक घटकांमुळे नखांची वाढ होण्यास मदत होते.

मटारमध्ये प्रोटिन्स, बिटा कॅरोटिन आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिरवे मटार खाल्ल्यास नखं मजबूत होतात.

सूर्यफुलाच्या बिया देखील मजबूत आणि सुंदर नखांसाठी उपयुक्त असतात. या बियांमधील महत्वाचे घटक नखं ( Healthy Nails ) वाढवण्यास मदत करतात.

मजबूत नखांसाठी चिकन खाणं ही अत्यंत फायदेशीर ठरतं. चिकनमध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण अधिक असल्याने त्याचा नखांना फायदा होतो.

उत्तम नखांसाठी पालेभाज्या या अत्यंत उपयुक्त असतात. पालेभाज्यांमध्ये शरिराला पोषक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे आहारात पालक आणि इतरही अनेक पालेभाज्यांचा समावेश करा.

– मृणाल गुरव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.