पुणे – शहरात शुक्रवारी करोनाच्या 247 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुणे विभागातील म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील बाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
शहरातील बाधितांची एकूण संख्या 1,73,402 झाली असून, विभागात 5 लाख 46 हजार 781 बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 1 लाख 63 हजार 779 रुग्ण बरे झाले असून, पुणे विभागातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 18 हजार 663 एवढी आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही पाच हजारांवर असून, गुरुवारी ती 5093 इतकी नोंदवण्यात आली. हीच संख्या पुणे विभागात 12 हजार 829 इतकी आहे.
शहरात दिवसभरात करोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. त्यातील चार जण पुणे हद्दीबाहेरील आहेत. जिल्ह्यातील मृतांची संख्या 15 हजार 289 आहे. हे मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. तर, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 94.86 टक्के नोंदवण्यात आले आहे. शहरातील क्रिटिकल रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती 382 झाली आहे. त्यातील 220 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकूण 30 लाख 22 हजार 882 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 5 लाख 46 हजार 781 नमून्यांचा पॉझिटिव्ह आहे.