बंगलुरू – इस्त्रोकडून सीएमएस – 01 हा दूरसंचार उपग्रह येत्या 17 डिसेंबर रोजी अवकाशात प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष केंद्रातून हा उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी हे प्रक्षेपण केले जाणार आहे.
या उपग्रहाद्वारे सी बॅंड फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम उपलब्ध होणार असून त्याची सेवा दूरसंचार क्षेत्राला अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतातर्फे सोडला जाणारा हा 42 वा दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपग्रह असणार आहे. पीएसएलव्ही – सी 50 द्वारे त्याचे अंतरीक्षात प्रक्षेपण केले जाणार आहे. पीएसएलव्ही यानाचे हे 77 वे अंतरीक्ष प्रक्षेपण असणार आहे.