नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 1 हजार 100 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 92 हजार 148 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.04 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज शहरात करोनाबाधितांचे तब्बल 666 रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 842 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 10 हजार 106 इतकी झाली आहे. तर आज चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे करोनाच्या आकडेवारी मध्ये समोर आले आहेे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 672, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 580 आणि अँटिजेन चाचणीत 590 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 321, अकोले 65, जामखेड 21, कर्जत 13, कोपरगाव 58, नगर ग्रामीण 38, नेवासे 5, पारनेर 18, पाथर्डी 5, राहता 10, राहुरी 3, संगमनेर 66, शेवगाव 1, श्रीरामपूर 26, कॅन्टोन्मेंट बोर्ड 18 आणि मिलिटरी हॉस्पिटल 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 178, अकोले 4, जामखेड 2, कर्जत 5, कोपरगाव 50, नगर ग्रामीण 30, नेवासे 10, पारनेर 9, पाथर्डी 11, राहाता 105, राहुरी 32, संगमनेर 46, शेवगाव 7, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 61, कॅन्टोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 16, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 590 जण बाधित आढळून आले. मनपा 167, कर्जत 15, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 61, नेवासे 39, पारनेर 34, पाथर्डी 43, राहाता 26, राहुरी 29, संगमनेर 1, शेवगाव 86, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 63, कॅन्टोन्मेंट बोर्ड 5 आणि इतर जिल्हा 7, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 399, अकोले 45, जामखेड 71, कर्जत 72, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 63, नेवासे 24, पारनेर 21, पाथर्डी 27, राहाता 93, राहुरी 65, संगमनेर 72, शेवगाव 15, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 78, कॅन्टोन्मेंट 11 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:92148
उपचार सुरू असलेले रुग्ण:10106
मृत्यू:1242
एकूण रुग्णसंख्या:1,03,496