नवी दिल्ली – करोना विषाणू ची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. विषाणूचा हा नवा अवतार थेट फुफ्फुसांना थेट संसर्ग करतो. त्यामुळे करोना झाल्याचे उशिरा लक्षात येते. करोना सातत्याने आपले रूप बदलत आहे आणि नवीन रूपामध्ये फुफ्फुसांना पुरेशी हानी झाल्यानंतर लक्षणे दिसू लागतात. यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांपेक्षा ही लक्षणे थोडी वेगळी आहेत. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लगेचच श्वसनाचे त्रास जाणवू लागतात तसेच प्रकृती देखील खालावते. करोनाच्या या लाटेत ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसत नाहीत .
नवीन लक्षणे खालील यादीत दिली गेलेली आहेत जर ही लक्षणे आपल्याला दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्यवेळीं योग्य तो उपचार घ्या .
1)डोकेदुखी
सातत्याने डोकेदुखी हे करोनाचे नवे लक्षण आहे. जर औषधाचा एक डोस घेऊन बर वाटत नसेल तर ही वेळ आहे डॉक्टरांच्या सल्ला घेण्याची.
2) डोळे लाल होणे
डोळे लाल होणे हे करोनाचे नवे लक्षण आहे. अनेकदा यासोबत डोळे सुजल्याचे आढळून आले आहे.
3) अंग दुखी
करोनाचे नवे लक्षण अंगदुखी हे आहे. औषध घेऊनही बरे वाटत नाही विशेषतः सांधे दुखत राहतात.
4) अतिसार
नेहमीपेक्षा जर पोट साफ करायला जास्तवेळा जावे लागत असेल तर तेही करोनाचे लक्षण आहे. यावेळी करोनाबाधितांच्या अतिसाराच्या तक्रारी आहेत.
5) अशक्तपणा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य लक्षणे दिसत आहेत अशक्तपणा हेही लक्षात आहे.अशाक्तपनाने डोळ्यापुढे अंधारी येत असेल तर काळजी घेणे आणि तपासणी घेणे चांगले.