Corona Vaccine Updates – देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दिनांक १६ ऑगस्ट) देशात लसीचे ८८.१३ लाख डोस देण्यात आले. देशात एका दिवसात करण्यात आलेल्या लसीकरणाचा हा आजवरचा सर्वाधिक आकडा आहे असं देखील केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत देशामध्ये लसींचे ५५ कोटी ४७ लाख डोस देण्यात आले आहेत. “देशातील ४६ टक्के लोकसंख्येला करोना प्रतिबंधात्मक लसीचा किमान एकतरी डोस देण्यात आला आहे. १३ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.” असं आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ( Corona Vaccine Updates )
उत्तर प्रदेशामध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक असून येथे ६ कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले आहेत. पैकी ५,०७,२२६२९ नागरिकांना लसीचा एक डोस तर ९४,२७,४२१ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या खालोखाल महाराष्ट्रामध्ये एकूण ५ कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आलेत.
दरम्यान, लसीकरण मोहिमेने वेग घेतला असतानाच देशात गेल्या २४ तासांमध्ये १५४ दिवसांतील सर्वात कमी करोना रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. देशात गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवे बाधित सापडले.