वॉशिंग्टन – जगाच्या किमान 25 टक्के भागाला करोनावरची लस ( corona vaccine update ) सन 2022 पर्यंत मिळणे अशक्य आहे असे एका अभ्यासात आढळून आले आहे. बीएमजे जर्नल मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही लस विकसित करण्याचे काम जितके अवघड होते तितकेच ती सर्वत्र समान प्रमाणात पोहचवणेही अवघड बनले आहे. जगातील गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना आपल्या नागरीकांसाठी ही लस ( corona vaccine update ) पुरवणे एक आव्हानच असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नागरीकांपर्यंत ही लस पोचण्यासाठी 2022 साल उजाडेल असे सांगण्यात येते. जॉन हापकिन्स ब्लुमबर्ग स्कुल या संस्थेने कोविड लसीसाठी ज्या देशांनी आपल्या ऑर्डरी नोंद केल्या आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास करून ही लस कोणत्या प्रमाणात किती देशांना मिळू शकेल याचा एक अंदाज या संस्थेने अभ्यासाअंती जाहीर केला आहे. त्यात त्यांनी हा निष्कर्ष वर्तवला आहे. त्यांनी म्हटले आहे की उच्च उत्पन्न गटातील देशांनी या लसीवर बऱ्यापैकी कब्जा केला असून त्यांच्या नागरीकांना याचा प्रथम लाभ होईल. या लसीचे समप्रमाणात वितरण होईल याची काळजी लस उत्पादक ( corona vaccine update ) आणि सरकारांनी घेतली पाहिजे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार जगातल्या उच्च उत्पन्न गटातील देशांनी 13 लस उत्पादकांकडून या लसीचे 7.48 अब्ज डोसेसची मागणी नोंदवली आहे. त्या देशांमध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या केवळ 14 टक्के लोक राहतात. त्यामुळे जगातील उर्वरीत 85 टक्के लोकसंख्येला या लसीसाठी बरीच प्रतिक्षा करावी लागणार आहे.