नवी दिल्ली – देशात करोना महासाथ आल्यापासून सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे, ‘देशात करोना प्रतिबंधक लस कधी येणार?’. देशवासीयांच्या या प्रश्नाला अखेर आज उत्तर मिळालं असून देशात करोना लसीकरणाला येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात येणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे लसीकरणाच्या या प्रथम टप्प्यात आरोग्यकर्मी, फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार असून त्यांची संख्या अंदाजे ३ कोटींच्या आसपास आहे. यानंतर ५० वर्षांवरील व आरोग्याशी निगडित व्याधी असणाऱ्या ५० वर्षांखालील नागरिकांना लस देण्यात येईल. या वयोगटातील लोकसंख्या २७ कोटींच्या आसपास आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणासाठी केलेल्या तयारीचीही माहिती घेतला. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार ही बैठक पार पडली.
PM Modi chaired a high-level meeting to review status of #COVID-19 in the country along with preparedness of the State/UTs for COVID vaccination, today. Meeting was attended by Cabinet Secretary, Principal Secretary to PM, Health Secretary, & other senior officials: Govt of India https://t.co/grfgIRk6wt
— ANI (@ANI) January 9, 2021