नौदलाच्या 150 जवानांना करोना लसीकरण

आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर रवनीश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेची सुरुवात

 

पुणे – आयएनएस शिवाजी येथील नौदल रुग्णालय असलेल्या आयएनएचएस कस्तुरी येथे नौदलाच्या जवानांसाठी (फ्रंटलाइन कामगार) कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी संस्थेतील 150 नौदल कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली.

भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, आयएनएचएस कस्तुरी येथे स्थापन झालेल्या दोन केंद्रांवर आयएनएस शिवाजीचे अधिकारी आणि नाविक यांच्यासह एकूण 150 आघाडीच्या कामगारांना लसी देण्यात आली.

या मोहिमेची सुरुवात आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर रवनीश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पुढील दोन आठवड्यांत युनिटच्या तब्बल 2000 नौदल कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. पहिल्या डोसच्या 28 दिवसांच्या अंतरावर लसीकरण बूस्टरचा दुसरा शॉट कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.