मुंबई – राज्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासून करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात रविवारी आणखी 2946 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक 1803 रुग्ण हे मुंबईतील आहेत. यामुळे मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.
राज्यात आज 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 16370 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 10889 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 2805 इतके सक्रिय रुग्ण आहेत.