लंडन- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेले सहा महिने जग कोरोनाशी दोन हात करत आहे. सहा महिने झाले आता तरी कोरोना जाईल या उद्देशाने सगळे काम करत आहेत. याच दरम्यान तज्ञांनी केलेल्या विधानामुऴे चिंता व्यक्त केली जात आहे.
यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे .आता तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही झाले आहे, कोरोनाच्या कोणत्या स्थितीला नवीन लाट म्हणावे.
कोरोना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून या संसर्ग कमी होईल, मात्र व्हायरस कायमचा जाऊ शकत नाही. बीबीसी वन कार्यक्रमात मार्क यांनी, ब्रिटन संदर्भात सांगितले की, देशातील परिस्थिती पाहता सप्टेंबरमध्ये पुन्हा लॉकडाउनची आवश्यकताही होती, असं मत प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी व्यक्त केलं आहे.