ड्राइव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा याबाबत सरकारचे नवे नियम, पहा कोणते बदल होणार?

मुंबई- सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अनेकांच्या खिशावर  परिणामाची शक्यता आहे. यात ड्राइव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा, फॉरेनला पैसे पाठवण्यावरील टीसीएस आदी महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश आहे.

ड्राइव्हिंग लायसन्स काढणं सोपं होणार आहे. त्यासाठी रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या सुधारणांविषयी नोटिफिकेशन काढलं आहे.  काम सुरळीत करण्यासाठी इ पोर्टलद्वारे काम सुरु होणार आहे. त्यासाठी जास्त कागपत्र जमा करण्याची गरज भासणार नाही.

प्रस्तावित बदलेल्या नियमानुसार मिठाई दुकानदाराला मिठाई वापरण्याची अंतिम तारीख सांगावी लागेल. किती दिवस ती मिठाई खाण्यायोग्य असेल, याची माहिती दुकानदाराने ग्राहकाला द्यायला हवी. FSSAI ने खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नवे बदल होणार आहेत. यामध्ये कमी दरामध्ये अधिक आजार कव्हर केले जाणार आहेत. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत. परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनवला आहे. परदेशात पैसे पाठवण्यावरील टीसीएसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.