मेक्सिको – मेक्सिकोतही कोविडच्या मृतांचा आकडा कमी दाखवला गेल्याची ओरड झाल्यानंतर तेथील सरकारने यात पारदर्शकता असली पाहिजे म्हणून कोविड मृतांची फेर तपासणी केली गेली. त्यात कोविड मृतांचा आकडा 4272 ने वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वाढीनंतर त्या देशातील कोविडने मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 2 लाख 27 हजार 840 इतकी झाली आहे. डॉक्टरांच्या मदतीने ही पहाणी करण्यात आली. 126 दशलक्ष संख्या असलेल्या या देशात अनेक जणांचे टेस्टींगच झाले नव्हते. त्यातील अनेक जण घरांतच दगावले. त्यांची नोंदच झाली नसल्याच आढळून आले आहे.
त्यामुळे मृतांचा नेमका आकडा समजण्यासाठी प्रत्येक मृतांच्या कारणांची फेरतपासणी करण्यात आली. त्यात कोविड मुळे मरण पावलेल्यांची संख्या 4272 ने अधिक असल्याचे आढळून आले आहे. जगातल्या अन्यही देशांनी मृतांच्या आकड्यांबाबत फेरतपासणी सुरू केली आहे.