सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी सकाळी निष्पन्न झालेल्या ४० करोना पाँझिटिव्ह रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई किंवा बाहेरुन येणारे पाँझिटिव्ह आढळत आहेत.
सातारा जिल्ह्यातील ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणीनंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील ४७ वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील ५८ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील २७ वर्षीय पुरुष व २० वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील ६० वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील ४० वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील २५ वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील ६७ वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील २८ वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील ३४ व ६० वर्षीय महिला, ९ वर्षाची दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील २७ वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील २९ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित ३६ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील ५१वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील ७० वर्षीय पुरुष.
मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील ४७ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील ४४ वर्षीय महिला व ५५वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील ३७ वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित २६ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, १० व ८ वर्षांचे बालक, ४६ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय युवक, ४४ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय युवक, १९ वर्षीय युवक,५२ वर्षीय महिला, अशा एकूण ४० नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मलकापूर ता. कराड येथील ४९ वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या २४१ झाली असून यापैकी १२१ जण उपचार घेत आहेत. ११४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.