नुहन : जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोनाच्या उत्पत्तीवरुन चीनवर सुरुवातीपासूनच शंका घेण्यात येत होती. त्यात आघाडीवर असणाऱ्या अमेरिकापासून युरोपच्या अनेक देशांनी चीनला दोषी ठरवत हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा आरोप केला होता. यामध्येच आता चिनी महिला शास्त्रज्ञाची भर पडली आहे. या महिलेने केलेल्या वक्तव्याने चीनमध्येच करोनाची निर्मिती झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
चीनमधील एका महिला व्हायरोलॉजिस्ट यांनी करोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा खळबळजन दावा केला आहे. तसेच आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचेही तिने म्हटले आहे. या व्हायरोलॉजिस्ट महिला शास्त्रज्ञाचे नाव डॉ. ली मेंग असे आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हायरोलॉजिस्ट डॉ.ली मेंग म्हणाल्या की, “जगभरात विळखा घालणाऱ्या या करोना महामारीची निर्मिती वुहानमधील लॅबमध्ये उत्पत्ती झाली आहे. हा विषाणू मानवनिर्मित आहे. याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच मी ते जगासमोर आणणार आहे. करोना विषाणूबद्दल चीनने जगापासून खूप काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत.”
ली मेंग म्हणाल्या की, करोनाची उत्पत्ती वुहानच्या मांस बाजारातून झालेली नाही. मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे तर विषाणू निसर्गाची निर्मिती नाही. हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला असून तो मानवनिर्मित आहे. करोना विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिटसारखा आहे. याआधारावर हा विषाणू मानवनिर्मित असल्याचं सिद्ध होते. कोणत्याही विषाणूमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की तो मानवनिर्मित आहे.