मराठा आरक्षणासाठी पुरंदर भाजपा आक्रमक
सासवड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांना लेखी निवेदन देऊन आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी व नियोजनासाठी पत्र देणार व त्यानंतर आमदार संजय जगताप यांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करणार आहे. या विषयीची माहिती पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष आर.एन. जगताप यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप करून पुरंदर तालुका भाजपाकडून आज सासवड येथील शिवतीर्थावर आंदोलन करण्यात आले त्यावेळी जगताप बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.