बॉलीवूडमधील देशी गर्ल आणि ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनसने शनिवारी सेशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोत ती नवीन हेयरकट फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत प्रियांका एका नवीन हेयरकटमध्ये एक सुंदर अशी स्माईल देण्यात दिसते.
प्रियांकाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “यू हेयर, डोंट केयर”. प्रियांकाचा हा नवीन लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. यात इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रीणींसह सहकर्मीचाही समावेश आहे.
अभिनेत्री पत्रलेखाने या पोस्टवर आपली प्रतिक्रिया देत एक हार्ट-आई ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच एका यूझरने कमेंट केली की, प्रियांका तू खूपच सुंदर दिसतेय. तर अन्य एकाने पोस्ट केले की, हेयरकट तुला खूपच सुंदर दिसत आहे.
दरम्यान, प्रियांका चोप्राने आपल्या आगामी सीरीजचे काम पूर्ण केले असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. “अनफिनिश्ड” असे या सीरिजचे नाव आहे. ही सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सीरिजची चाहत्यांना अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी चित्रपटगृह बंदच असल्याने चाहत्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.