कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू

कोल्हापूर – आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 308 जण नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 161 रुग्ण कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. तर उपचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 54 हजार 703 पॉझीटिव्हपैकी 50 हजार 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 2408 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान दिवसभरात 99 कोरोना बाधित उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दिवसभरात 11 कोरोना बधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 308 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-6, भुदरगड-7, चंदगड-1, गडहिंग्लज- 12, गगनबावडा-1, कागल-3 , करवीर-29, पन्हाळा-10 , हातकणंगले- 19 , राधानगरी-7- शाहूवाडी-3, शिरोळ-15 नगरपरिषद क्षेत्र-26 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 161 आणि इतर जिल्हा व राज्यातील- 8 असा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.