करोना विषाणूच्या उगमाचा शोध घेण्याची अमेरिकेची पुन्हा मागणी

वॉशिंग्टन  – अमेरिकेने कोविड -19 च्या उत्पत्तीच्या तपासणीसाठी आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि चीनला चौकशीत सहकार्य न केल्याबद्दल फटकारले आहे. करोनाच्या साथीचा उद्रेक होण्याच्या प्रारंभाच्या काळात पारदर्शकता न दाखवल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी चीनवर कडवट टीका केली आहे. गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्त चौकशी केल्याचा अहवाल आला आहे. या विषाणूचा प्रसार कसा किंवा केव्हा होऊ लागला हे या अहवालातून निश्‍चितपणे स्पष्ट झाले नाही. त्या पार्श्‍वभुमीवर ब्लिंकन यांनी ही टीका केली आहे.

चीनला हे माहित आहे की कोविडच्या सुरुवातीच्या काळात, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना माहिती देणे, माहिती सामायिक करणे आणि खरी पारदर्शकता यावी यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. त्या अपयशाचा एक परिणाम म्हणजे विषाणू जगभर पसरला आणि त्याने उग्र स्वरुप धारण केले आहे, असे एका मुलाखतीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन म्हणाले.

प्रयोगशाळेऐवजी वन्यजीवांकडून हा विषाणू आला असा निष्कर्ष चीन आणि जागतिक्‍ आरोग्य संघटनेने काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या गटाने कोविड -19 च्या मूळ उत्पत्ती विषयी नव्या चौकशीची मागणी केली आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील 24 शास्त्रज्ञांनी एक खुले पत्र लिहीले आहे. त्यामध्ये अधिक व्यापक तपासणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियांचे विश्‍लेषण केले गेले आहे. सन 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा नोंदविण्यात आलेल्या कोविड -19 च्या उत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी “डब्ल्यूएचओ’ किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य काही राष्ट्रांच्या दुसऱ्या गटाने एकतर जैव सुरक्षा आणि जैवसुरक्षा तज्ञांचा समावेश चौकशीसाठीच्या पथकामध्ये असावा अशी विनंती शास्त्रज्ञांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.