पुणे -शहरात शनिवारी 175 करोना बाधित सापडले. तर, 253 जण करोनामुक्त झाले. शहरात दिवसभरात 7 हजार 891 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात सक्रीय बाधित संख्याही घटली असून, आज 1 हजार 781 बाधितांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यातील 176 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 291 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. करोनामुळे आज पाच जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 3 व शहराबाहेरील 2 जणांचा समावेश आहे.