पुणे.- पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने 40 हजार व्यापारी वर्गाने 3 दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणजेच मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोडवरील सगळे दुकानं 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातीस व्यापाऱ्यांनी हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. त्याच बरोबर शाळा, जीम, सार्वजनिक ठिकाणं, मंदिरं, किल्ले या ठिकाणी जाण्यास सरकारनं बंदी घालती आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३१ वर गेला आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक गोष्टी सोडल्यास बाकी सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली आहे.