Corona Effect | करोनामुळे शेअर बाजार निर्देशांकांत मोठी ‘घट’

मुंबई – मार्च आणि एप्रिल महिन्यात देशातील मोठ्या शहरात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे बऱ्याच शहरात अंशत: लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. याचा परिणाम औद्योगिक घडामोडीवर होणार आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी पावणेदोन टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले.

बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.54 टक्‍क्‍यांनी म्हणजे 229 अंकांनी कोसळून 14,637 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 870 अंकांनी म्हणजे 1.75 टक्‍क्‍यांनी कोसळून 49,159 अंकांवर बंद झाला.

आज झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका बजाज फायनान्स या कंपनीला बसला आणि या कंपनीचे शेअर्स सहा टक्‍क्‍यांनी कोसळले. इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, महिंद्रा, ऍक्‍सिस बॅंक, आय सी आय सी आय बॅंक, बजाज ऑटो या कंपन्यांचे शेअरही कोसळले. मात्र या पडत्या काळात एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर वधारले.

जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले की. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्याचा पहिल्या तिमाहीतील औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वारे आहेत. अशा परिस्थितीमध्ये या आठवड्यात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात बाबत काय निर्णय घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

मात्र आज स्टेट बॅंकेने घराच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा अर्थ रिझर्व बॅंक व्याजदराबाबत मवाळ धोरण जाहीर करण्याची शक्‍यता नाही. बॅंकातून दिल्या जात असलेल्या कर्जात वाढ होत असल्याची आकडेवारी समोर आली असतानाच करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकूणच समीकरणावर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. या घडामोडीचा आज क्रुडच्या किमतीवर ही परिणाम होऊन क्रुडचे जर दोन टक्‍क्‍यांनी कमी झाले.

रुपया घसरला
शेअर बाजारांमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला. रुपयाचे मूल्य सोमवारी 18 पैशांनी कमी होऊन 73.30 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. अमेरिकेचा डॉलर बळकट होत असल्यामुळे त्याचा इतर देशांच्या चलनावर परिणाम होत आहे, असे बीएनपी परिबा संस्थेचे विश्‍लेषक सैफ मुकादम यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.