Corona Vaccination | बारामती शहरात लसीकरणाला वेग; शारदा प्रांगणात केंद्र सुरू

बारामती – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बारामती शहरात लसीकरण केंद्र वाढवण्यात आले आहेत. शहरातील शारदा प्रांगण येथे आजपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे शहरात लसीकरणाने वेग घेतला आहे.

बारामती मध्ये आज शारदा प्रांगण येथील शाळा क्रमांक 5 मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. बारामती शहरांमधील नागरिकांना जवळच्या अंतरामध्ये जाऊन लस घेण्याच्या संदर्भात उपायोजना करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार आजपासून हे लसीकरण केंद्र सकाळी दहा वाजता सुरू झाले आहे .दिवसभराच्या कालावधीत शहरांमधील सुमारे तीनशे नागरिकांनी लस टोचून घेतले आहे.

या लसीकरण केंद्रामध्ये आलेल्या नागरिकांना कमीत कमी वेळामध्ये लस टोचली जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे .सिल्वरजुबली जिल्हा उपकेंद्र, बारामती नगर परिषद शासनाचा आरोग्य विभाग, यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये चार जणडेटा ऑपरेटर म्हणून तर केसपेपर काढण्यासाठी चार जण कार्यरत आहेत.

रक्तदाब तपासणीसाठी तीन डॉक्टर ची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉक्टर दोन डॉक्टर अंधारे लसीकरण दिले जात आहे. पुरुष व महिला स्वतंत्र कक्ष तसेच लस दिल्यानंतर औषधे देऊन 20 मिनिटे विश्रांती घेण्याकरिता चा कक्ष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सदरची यंत्रणा कार्यान्वित करत असताना या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जात असून त्यामध्ये बारामतीमधील व वृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे, अभिजीत चव्हाण यांनी सहभाग घेऊन येथील व्यवस्थापन पाहिले. आहे डॉ. सदानंद काळे यांनी याबाबतचे संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करून नियोजन केले आहे.

“शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. शारदा प्रांगण येथे आजपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. लसीकरण केंद्रास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तीनशेहून अधिक नागरिकांनी शारदा प्रांगण येथील लसीकरण केंद्रात लस घेतली. कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.”
– किरण गुजर ,ज्येष्ठ नगरसेवक बारामती नगर परिषद.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.