नवी दिल्ली : जगात कोरोनाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. या कोरोनापुढे मोठ्या मोठ्या महासत्ता असणाऱ्या देशांनी हात टेकले आहेत. भारतातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. जगात या सगळ्या घडामोडी घडत असताना पृथ्वीवर असे काही देश आणि बेट आहेत ज्यांना कोरोना काय आहे माहितीच नाही. अर्थात या देशांमध्ये कोरोनाची अजूनही एन्ट्री झालेली नाही किंवा असे म्हणता येईल कि या देशाच्या प्रशासनाने कोरोनाला देशामध्ये प्रवेशच करू दिला नाही.
किरिबीटी, अमेरिकन सामोआ, लेसेथो, मार्शल आयर्लंड, या देशांमंध्ये अजूनही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यासोबतच कोमोरोस, मायक्रोनेशिया, नऊरू, उत्तर कोरिया, पलाऊ, सामोआ, साओ टोमे आणि , दक्षिण सुदान, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालु, वानुआटु, येमेन,टूउलु या देशांमध्ये अजूनही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. त्यासाठी या सर्व देशांनी केलेल्या उपाययोजना महत्वाच्या मानल्या जात आहेत.
जगातील इतर देशांमध्ये कोरोनाचा तांडव सुरु झाला त्याचवेळी या १८ देशांनी देशात कडक उपाययोजना आखल्या. त्यातही आंतरराष्टीय सीमा बंदी तात्काळ केली. परदेशी कोणत्याही नागरिकाला त्यांच्या देशात आणि देशातील नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. इतर देशासोबत संपर्क होईल अशा सर्व आंतरराष्ट्रीय सीमा पूर्णपणे बंद केल्या. देशातही त्यांनी कडक उपाय आखले.त्यामुळे या १८ देशांनी कोरोनाला त्यांच्या सीमेवरच थोपवले आहे. या देशांनी जे वेळीच इतर देशांनी केल असतं तर जगात या कोरोनाने एवढे हातपाय पसरले नसते.