नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत 1 लाख कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, आता पर्यंत देशात 64 लाख नागरिक कोरोना संक्रमित आहेत. आणि 54 लाखांहून अधिक लोक कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, सर्वाधिक कोरोना बाधित देशात असल्यामुळे बाधितांच्या तुलनेत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मृत्यूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात मृत्यूची संख्या 1 लाख 700 च्या जवळपास आहे, तर अमेरिकेत 2 लाख 8 हजाराहून अधिक आणि ब्राझीलमध्ये 1 लाख 44 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत मेक्सिको चौथ्या क्रमांकावर असून 78 हजाराहून अधिक लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तसेच, इंग्लंड पाचव्या स्थानावर 42 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.
जगभरात 1 दशलक्षाहून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यानुसार, जगात दर दहापैकी एक मृत्यू भारतात झाला आहे. अलिकडच्या काळात जगात दररोज 4 ते 6 हजार मृत्यू होत आहेत, तर भारतात दररोज सुमारे 1 हजार मृत्यू होतात.