करोना तिसऱ्या महायुध्दासाठी चीनचे अस्त्र! 2015 मधील चीनी शास्त्रज्ञांच्या कागदपत्रांतून ‘धक्कादायक’ खुलासा

चीनी संशोधकांच्या 2015 मधील कागदपत्राच्या सहाय्याने दावा

बिजिंग/सिडनी – सार्स करोनाविषाणू हे जैविक अस्त्राचे नवे पर्व आहे. या विषाणूंचा वापर मानवी आजारात करता येईल नंतर ते शस्त्र म्हणून वापरून सर्व संपवता येईल, असा ऊल्लेख चीनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी करोनाची साथ येण्यापुर्वी 2015 मध्ये लिखीत स्वरूपातील कागदपत्रात केला असल्याचे वृत्त विकेंड ऑस्ट्रेलियन या विख्यात नियतकालिकाने दिले आहे.

सार्सचा अनैसर्गिक उगम आणि मानव निर्मित विषाणूंच्या नव्या जातींची जैविक अस्त्रे या नावाने लिहलेल्या या लेखात तिसरे जागतिक महायुध्द जैविक अस्त्रांच्या सहाय्याने लढले जाईल, असे सुचवले आहे. या कागदपत्रात चीनी लष्करी संशोधक सार्स करोनाविषाणूंचा वापर शस्त्र म्हणून करण्याची चर्चा ही साथ येण्याआधी पाच वर्ष करत होते.

हे शास्त्रज्ञ चीनी प्रयोगशाळेतून हे विषाणू यावेत यासाठी का भर देत होते. त्याची कारणमिमांसा करताना ऑस्ट्रेलीयन सामरिक धोरण संस्थेचे कार्यकारी संचालक पिटर जेनिंग म्हणाले, ही कागदपत्रे आम्हाला मिळाली त्यावेळी त्या आग ओकणाऱ्या तोफाच आहेत, असे आम्हाला वाटले. 

करोनाच्या विषाणूंच्या वेगवेगळ्या अवताराचा लष्करी वापर करण्याचा चीनी शास्त्रज्ञ विचार करत होते. हे ही कागदपत्रे पुरेशा प्रमाणात स्पष्ट करतात. त्याचा वापर कसा करायचा याचाही त्यांनी विचार केला होता, असे जेनिंग यांनी स्पष्ट केले.

विषाणूंच्या लष्करी वापराबाबतची कागदपत्रे अपघाताने बाहेर आली. त्यामुळे आम्ही ही शक्‍यता इतक्‍या थेटपणे व्यक्त करू शकत आहोत, अशी पुस्ती जोडून ते म्हणाले, करोनाच्या विषाणूंचा उगमस्थान शोधण्यास आलेल्या विदेशी पथकाशी कठोरपणे चीन का वागत होता, हे या कागदपत्रावरून समजू शकते. जर या विषाणूचा संसर्ग चीनच्या मांस बाजारातून आला, असे चीनला त्यांच्या फायद्यासाठी सांगायचे असेल तर त्याच्या विरूध्द बाजूला आम्ही होतो.

या कागदपत्राची सत्यता पडताळण्याची जबाबदारी या नियतकालिकाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांच्याकडे सोपवली. ते म्हणाले, ही कागपत्रे निश्‍चितपणे बनावट नाहीत. ही कागदपत्रे अस्सल आहेत, याचा आम्हाला प्रचंड विश्‍वास आहे. पण त्याचे गांभीर्य किती आहे हे सांगायला दुसऱ्या कोणाची तरी गरज आहे, असे पॉटर यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षात त्यांनी (चीनने) ही कागदपत्रे नष्ट करण्याचा निश्‍चितपणे प्रयत्न केला असेल. पण त्याचा आता शोध लागला आहे, असे ते म्हणाले.

चीन ज्या संशोधनात मागे आहे, आणि त्यात त्यांना प्रगती करायची आहे, अशा संशोधनपत्रांवर नेहमी झडत आली आहे. त्यात वावगे काही नाही. या लेखात शास्त्रीय संशोधक कसा विचार करतात, हे पाहणे कमालीचे उत्कंठापूर्ण आहे, असेही पॉटर म्हणाले.

कोविड 19 ही साथ करोनाच्या निषाणूंमुळे 2019मध्ये आली. या विषाणूंमुळे माणसाला साधा ताप ते श्‍वसनाचे तीव्र विकार उद्‌भवू शकतात. ही साथ सुरू झाल्यापासून त्याची सुमारे 16 कोटी लोकांना बाधा झाली आहे. तर 32 लाख लोकांनी यात प्राण गमावले आहेत, असे जॉन हॉपकिंग्ज विद्यापीटाच्या ताज्या माहितीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.