वाघोली (प्रतिनिधी) : बकोरी तालुका हवेली येथिल 2 वर्षाचे बाळ कोरोना पाॅझीटीव्ह झाले असून त्यास पुढील उपचार कामी केईएम हाॅस्पीटल येथे अॅडमीट करण्यात आल्याची माहिती पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी हौदेकर यांनी दिली आहे.
बकोरी येथील या लहान बाळावर काही महिन्यांपूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती. आरोग्य तपासणी मध्ये पुणे येथील एका रुग्णालयात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तपासणी करण्यात आली तेव्हा संबंधित लहान बाळ पॉझिटिव असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. बकोरी गावात तातडीने आरोग्याच्या व इतर सुरक्षिततेचे उपाय योजना करण्याबाबत प्रशासन सज्ज झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, बकोरी गावामध्ये सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात येणार असल्याचे हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले.