पेंटॅगॉनमध्ये हेरगिरी केल्यामुळे ठरले होते वादग्रस्त
कॅलिफोर्निया – व्हिएतनाम युद्धाशी संबंधित अत्यंत गोपनीय कागदपत्रे पेंटॅगॉनमधून उघड करणाऱ्या डॅनियल एल्सबर्ग यांचे शुक्रवारी संध्याकाळी कॅलिफोर्नियामध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
एल्सबर्ग यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. हॉर्वर्ड विद्यापीठामधून अर्थशास्त्राची पी.एच.डी. संपादन केलेल्या एल्सबर्ग यांनी काही काळ मरीन कॉर्प्समध्ये सेवादेखील केली होती. शीतयुद्धाच्या काळात त्यांनी संरक्षण विभागामध्ये मिलिटरी ऍनालिस्ट म्हणून नोकरीदेखील केली होती.
संरक्षण विभागाने त्यांना 1965 मध्ये सयगोनला पाठवले होते. तेथे अमेरिका आणि साउथ व्हिएतनामच्या सैन्याबरोबर टेहळणीच्या कामात ते रुजू झाले होते. हे युद्ध जिंकू शकणार नाही, हे लक्षात आल्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि 1971 साली पेंटॅगॉनच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केले. यामध्ये गोपनीय कागदपत्रे उघड केली गेली होती. “द डुम्सडे मशीन : कन्फेशन ऑफ न्युक्लिअर वॉर प्लॅनर’ या पुस्तकामुळे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांना माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अण्वस्त्रविरोधी चळवळीसाठी अनेक दशकांच्या कार्यासाठी अमेरिकेतील सर्वात धोकादायक माणूस म्हणून ओळखले गेले.
पेंटॅगॉनमधील कागदपत्रे उघड होण्याचे प्रकरण “पेंटॅगॉन पेपर्स’ नावाने प्रसिद्ध होते. ही गोपनीय कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्याशी संबंधित कायद्यामध्ये अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने दुरुस्ती करण्याचा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालामुळे निक्सन प्रशासन संतप्त झाले होते.