मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज 19 जून रोजी निधन झाले आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीला त्यांनी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकात त्यांनी काम केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी अप्रतिम अभिनय केला.
या चित्रपटांमध्ये केले काम
सवाल माझा ऐका, मोलकरीण,मोहित्यांची मंजुळा, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, असला नवरा नको गं बाई, चंदनाची चोळी आणि सोंगाड्या, अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यांची घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले. भालजी पेंढारकर, अनंत माने यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले आहे. मात्र अभिनेत्री शांता तांबे यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.