पुणे – मार्केट यार्डातील किरकोळ बाजाराकडे ग्राहकांनी पहिल्या दिवशी फिरविली पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. शिवनेरी, सातारा रस्त्यावर आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या अनाधिकृत किरकोळ विक्रीचा फटका या बाजाराला बसला आहे.
करोना संसर्गामुळे मागील दोन महिन्याहून अधिक काळापासून बंद असलेला हा बाजार आजपासून (रविवार, दि. 14) सुरू झाला. तेथे सुमारे 150 विक्रेते असून, त्यापैकी दररोज 50 जणांना विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी बाजार सुरू करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. अचानक बाजार सुरू झाल्याने विक्रेतीही कमी आलेच होते. ग्राहक तर अतिशय कमी प्रमाणात आले.
शिवनेरी रस्त्यावर रविवारी मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रेते बसले होते. तसेच, लॉकडाऊनमुळे शहराच्या विविध भागातही टेम्पोतून येऊन आणि बसून विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथेच खरेदी करण्यास ग्राहकांनी पसंती दिली. त्याचा फटका मार्केट यार्डातील किरकोळ बाजाराला बसला आहे. परिणामी, ग्राहक कमी प्रमाणात आले. याविषयी किरकोळ विक्रेते संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढमढेरे म्हणाले, आजपासून बाजार सुरू झाला आहे. ग्राहक नगण्य होते. मात्र, आता हळूहळू ग्राहक वाढण्यास सुरूवात होईल.