जुन्नर – जुन्नर तालुक्यात शनिवारी (दि.8) सहा व्यक्ती करोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जुन्नर शहरात 3, तेजेवाडी, वडगाव कांदळी व गुंजाळवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यातील एकूण संख्या 508 झाली आहे. यांपैकी 365 जणांना उपचारानंतर घरी परतले आहेत. उर्वरित
119 ऍक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर पारुंडे व बेल्हे येथे प्रत्येकी एका पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील एकूण बळींची संख्या 24 झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली.