कोल्हापूर – गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापुरात करोना संसर्गाचा दर जास्त असल्याने व्यापारी वर्गाला आपले दुकानं बंद ठेवावी लागली होती. पण आता कोल्हापुरात करोना पेशंटचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय.
त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांचं हित लक्षात घेऊन शासनाने आजपासून (दि. १९) अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानही उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यावेळी व्यापारी वर्गाला शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असणार आहे.
कोल्हापुरातील व्यापारी, दुकानदार आज कित्येक महिन्यांनंतर मोकळा श्वास घेणार आहेत. कारण जिल्ह्यातील सर्व दुकाने उडायला आजपासून परवानगी देण्यात आलेली आहे.
सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत दुकान उघडता येणार आहे. जवळपास तीन महिन्यानंतर जिल्ह्यातील व्यवसाय सुरळीत होणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे.