माॅस्को : भारताची युवा महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने महिलांच्या जागतिक रॅपिड बुध्दिबळ अंजिक्यपद २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ३२ वर्षीय हम्पीने टायब्रेकर सामन्यामध्ये चीनच्या लेई टिंगजिएला पराभव करत सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावले.
Humpy Koneru 🇮🇳 is the 2019 Women's World Rapid Champion. 🏆
Tied for first with 9/12, she defeated Lei Tingjie in a playoff for the first place. Congratulations!👏https://t.co/gHBnFGa1e5 #rapidblitz #chess #India pic.twitter.com/tbHjCk8kUM
— International Chess Federation (@FIDE_chess) December 28, 2019
जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेच्या सध्याच्या प्रारूपामध्ये सुवर्णपदक जिंकणारी केवळ दुसरी भारतीय ठरली. यापूर्वी, २०१७ मध्ये भारतीय स्टार विश्वनाथन आनंदने खुल्या गटात या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तर हम्पीने या स्पर्धेत दुस-यांदा पदक मिळविले. २०१२ मध्ये या स्पर्धेत तिने ब्राँझपदक मिळविले होते.
स्पर्धेत चीनच्या लेई टिंगजिएला दुस-यांदा या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१७ मध्ये या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते. अटालिकला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.