नवी दिल्ली : इंडियन सुपर लीग (आयएसएल)ने विविध कारणांमुळे २०१९-२० सत्रातील सहा सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. याबाबत ‘आयएसएल’ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे.
🚨 Updated Fixtures 🚨
Read more about all the fixture updates 👇#HeroISL #LetsFootball https://t.co/JHnoCH45C4
— Indian Super League (@IndSuperLeague) December 29, 2019
यामध्ये १२ डिसेंबरला नाॅर्थइस्ट युनायटेड एफसी वि. चेन्नइयिन एफसी ही लढत आता २५ फेब्रुवारीला इंदिरा गांधी स्टेडियमवर होईल. तसेच २ जानेवारीला नाॅर्थइस्ट युनायटेड आणि जमशेदपूर एफसी अशी होणारी लढत आता १० फेब्रुवारीला होईल.
तर ७ फेब्रुवारीचा चेन्नईयन एफसी वि. बेंगलुरू एफसी लढत आता ९ फेब्रुवारीला होईल. ९ फेब्रुवारी रोजी होणारी नाॅर्थईस्ट युनायटेड वि. केरळ एफसी ब्लास्टर्स लढत आता ७ फेब्रुवारी रोजी खेळविण्यात येईल.
हैदराबाद वि. जमशेदपूर ही लढत १२ फेब्रुवारी ऐवजी १३ फेब्रुवारी आणि एफसी गोवा वि. मुंबई सिटी सामना १३ फेब्रुवारीएवजी १२ फेब्रुवारीला होईल.