सागरदिघी – कॉंग्रेसने गुरुवारी विद्यमान पश्चिम बंगाल विधानसभेत पहिली जागा मिळविली आहे. त्यांचे उमेदवार बायरन बिस्वास यांनी सागरदिघी पोटनिवडणूकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी तृणमुल कॉंग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 22,986 मतांनी पराभव केला.
मतमोजणीच्या 16 फेऱ्यांनंतर, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, डाव्यांचा पाठिंबा असलेल्या विश्वास यांना 87,667 मते मिळाली. टीएमसीच्या देबाशीष बॅनर्जी यांना 64,681 मते मिळाली, तर भाजपचे दिलीप साहा यांना 25,815 मते मिळाली. या आधी ही जागा सुब्रत साहा यांच्याकडे होती. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगाल विधानसभेत त्यांचे खाते उघडण्यातही अपयश आले होते.यावेळी मतांची विभागणी टाळण्यासाठी डावे पक्ष आणि कॉंग्रेसने आघाडी केली होती.