लखनौ – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये केलेलं एक वक्तव्य चांगलंच गाजलं होत. गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील रस्ते २०२४ पूर्वी अमेरिकेसारखे करू असं विधान केल्याने यावरून चर्चा रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. राजकीय धुराळा उडवून देणारी विधाने करण्यापेक्षा गडकरी कामाला प्राधान्य देतात असं त्यांच्याविषयी बोललं जात. मात्र अमेरिकेसारखे रस्ते करू या त्यांच्या विधानावरून आता ते विरोधकांच्या रडारावर आले आहेत. गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने एक व्हिडीओ ट्विट करत उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवत गडकरींना आरसा दाखवला आहे. ( congress on nitin gadkari )
काँग्रेसने ट्विट केलेला व्हिडीओ
काँग्रेसतर्फे एक व्हिडीओ ट्विट करण्यात अल्ला असून यामध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं दिसतंय. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी तुडुंब भरलं असून खड्डा चुकवताना एक रिक्षा रस्त्यावरच कोलमडताना दिसत आहे. रिक्षाचा तोल गेल्याने प्रवाससी रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याचं दिसतंय. दरम्यान, हे सर्व होत असताना शेजारून सरकारी गाड्यांचा ताफा जाताना दिसतोय. मात्र ताफ्यातील कोणीही दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीये.
व्हिडिओला कॅप्शन देताना काँग्रेसने हा केवळ जुमला असल्याचे म्हंटले आहे. ( congress on nitin gadkari )
काय म्हणाले होते गडकरी?
उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी, ‘राज्यात 2024 पूर्वी एकूण पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून राज्यातील रस्ते अमेरिकेसारखे होणार आहेत. या गुंतवणुकीतून उत्तर प्रदेशमधील पायाभूत विकासाला चालना मिळणार आहे. यामध्ये शाहाबाद बायपास ते हरदोई बायपास 1212 कोटी रुपये, शाहजहापूर ते शाहाबाद बायपास 950 कोटी रुपये, मुरादाबाद ते काशीपूर राष्ट्रीय महामार्ग 2007 कोटी रुपये, गाजीपूर ते बालिया महामार्ग 1708 कोटी रुपये आणि 13 रेल्वे पूल यांचा समावेश असणार आहे. तसेच या व्यतिरीक्त देखील अनेक योजनांचा समावेश आहे.’ असं म्हंटल होत.
जुमला: “यूपी की सड़कें अमेरिका जैसी होंगी”
यूपी की अमेरिका जैसी सड़क 👇 pic.twitter.com/HxqNCeZ1sH
— Congress (@INCIndia) October 11, 2022