इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ वाटप आंदोलन

रेडा (प्रतिनिधी) – शंभरीकडे चाललेला पेट्रोल व डिझेल तसेच हजारीकडे चाललेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतींविरोधात सोमवार (दि. २२) फेब्रुवारीरोजी इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक पेट्रोल पंपांवर वाहन चालकांना लॉलीपॉप वाटप करून निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी बोलताना कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार हे व्यापारी विचाराचे सरकार आहे. संपूर्ण देश विकायला काढला असून, देशातील सर्वच शासकीय कंपन्या खाजगीकरण चालू आहे.  

करोनासारख्या महामारीच्या अत्यंत बिकट काळात देखील सरकार अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोल डीजेल व घरगुती गॅसकडे नफेखोरीच्या नजरेतून बघत आहे. सरकारने लावलेला भरमसाठ कर कमी केला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या दिवसात महागाई नवा उच्चांक करेल व ह्यात सर्वसामान्य जनता भरडून निघेल, भाजपने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. असेही मत सावंत यांनी मांडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत, सबके साथ विश्वासघात अशा घोषणा दिल्या.

यावेळी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत, पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिर काझी, तालुका कार्याध्यक्ष काका देवकर, इंदापूर शहर अध्यक्ष रमजानभाई ( चमन ) बागवान, निवास शेळके, राहुल वीर, महादेव लोंढे , शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर, रवींद्र फाळके, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, मिलिंद साबळे , सुफियानखान जमादार, समीर शेख आदी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.