शिवमोग्गा – कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते येत्या २२ जानेवारीला देशभरातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजा करतील अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की २२ जानेवारीनंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपणही अयोध्येत रामाच्या दर्शनाला जाणार आहोत.
मला राम मंदिराच्या उद्घाटनाचे (२२ जानेवारी) निमंत्रण मिळालेले नाही. श्रीरामाला वंदन करण्यासाठी आम्ही भाजपच्या मागे धावत नाही आहोत. आम्हीही रामाची पूजा करतो पण भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत. आम्ही त्यांच्या राजकारणाला आमचा विरोध आहे आमचा विरोध श्री रामचंद्रांना नाही, असे त्यांनी या जिल्हा मुख्यालयात पत्रकारांना सांगितले.
काँग्रेस सरकारच्या पाचव्या हमीचा शुभारंभ करण्यासाठी येथे आलेले मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते २२ जानेवारी रोजी राज्यभरातील राम मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना करतील.