नवी दिल्ली: कॉंग्रेसने रविवारी बिहारमधील एका लोकसभा जागेसाठी आणि राजस्थान, उत्तर प्रदेशातील चार विधानसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.
कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारच्या आरक्षित समस्तीपूर मतदारसंघातून अशोक कुमार यांना उमेदवारी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.”
समस्तीपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लोक जनशक्ती पार्टीचे सदस्य रामचंद्र पासवान यांच्या निधनामुळे होत आहे. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील विरोधी महाआघाडीने 40 पैकी केवळ एक जागा जिंकली होती.
निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका जाहीर केल्या. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.
INC COMMUNIQUE
Following persons have been approved as party candidate for the forthcoming bye -elections to the Legislative Assembly of Bihar, Rajasthan & Uttar Pradesh pic.twitter.com/ERNqbG3baq
— INC Sandesh (@INCSandesh) September 29, 2019