अंथुर्णे परिसरात भाजपला भगदाड 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही दुजाभावाची वागणूक देणार नाही : दत्तात्रय भरणे

रेडा(प्रतिनिधी): भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस संतोष भोसले व भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शेखर काटे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे अंथुर्णे परिसरात भाजपला भगदाड पडले आहे.

यावेळी संतोष भोसले म्हणाले की,भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना  आम्हाला न्याय देण्याची भूमिका वरिष्ठ स्तरावरून कधीही झालेली नाही. राज्यात पाच वर्ष सत्तेमध्ये भाजप सरकार असताना देखील, अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावलले जात आहे. यापुढील काळात आम्ही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करणार असून, आमच्या डोक्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी कायम हात ठेवावा. अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली.

भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये कधीही जातीचा पातीचा विचार केला जात नाही. तर सर्व समाजातील घटकांना कसा न्याय देता येईल याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते. त्यामुळे कोणतेही राजकीय पक्षातून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना कधीही दुजापणाची वागणूक मिळणार नाही. भरणे यांनी यावेळी दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, शेतकरी कामगार अपंग कल्याण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते योगेश डोंबाळे, बाबासाहेब गायकवाड, नितिन खरात, कालिदास राऊत आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)