नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला केल्याप्रकरणी काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नागपूर शहरातील व्हरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोरकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राजकारण पेटले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांक गाधी इंडिया गेटसमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत.
आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली. अधिवेशच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. अधिवेशन संपताच काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणावरुन भाजपविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत. विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे सर्व आमदार सहभागी झाले आहेत.