नवी दिल्ली : अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. जो बायडन यांचा राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations @JoeBiden on your spectacular victory! As the VP, your contribution to strengthening Indo-US relations was critical and invaluable. I look forward to working closely together once again to take India-US relations to greater heights. pic.twitter.com/yAOCEcs9bN
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
जो बायडन यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शुभेच्छा देताना मोदींनी बायडन यांच्याशी गळाभेट घेताना एक फोटो देखील शेअर केला आहे.
Heartiest congratulations @KamalaHarris! Your success is pathbreaking, and a matter of immense pride not just for your chittis, but also for all Indian-Americans. I am confident that the vibrant India-US ties will get even stronger with your support and leadership.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचेही अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘तुमचे यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.