पुणे महापालिकेत लसीकरण नियोजनाचा सावळा गोंधळ

पुणे – करोना रोधक लसीकरणासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने 16 केंद्र निश्‍चित केली होती. पुण्यात पहिल्या टप्प्यात 52 हजार 702 लाभार्थी आहेत. 15 सेंटररवर दररोज 100 लाभार्थी असे गृहित धरले, तरी एका दिवसात केवळ दीड हजार लाभार्थींना लस देता येणार आहे. सरकारी आणि खासगी आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय सेवकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनीही आमच्या रुग्णालयाच्या केंद्राला प्राधान्य द्या, यासाठी आरोग्य विभागाकडे साकडे घालायला सुरुवात केली आहे.

लसीकरण मोहीम कधी करणार?; खासगी रुग्णालयांची सतत विचारणा

शहरासाठी किती संख्येत लस मिळणार याची स्पष्टताच नसल्याने लस नियोजनाचा सावळा गोंधळ महापालिकेत पहायला मिळाला. आमच्या कर्मचाऱ्यांना लस कधी मिळणार, आमच्या हॉस्पिटलमध्ये सेंटर करणार आहात का, आम्हांला काय तयारी करायची आहे, आदी प्रश्‍नांचा भडीमार खासगी रुग्णालयातील प्रतिनिधींनी सोमवारी महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यावर केला.

मुळात राज्यालाच लस किती संख्येत मिळणार, याचीच माहिती नसल्याने आणि त्यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना किती मिळणार याची त्याहून माहिती नसल्याने खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना काय उत्तर द्यावे, हा प्रश्‍न आरोग्य प्रमुखांना पडला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.