करोना टेस्टचा गोंधळ : रुग्णाचा स्वॅब न घेताच रिपोर्ट आला पॉझिटीव्ह

बुलडाणा – राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने करोना चाचण्याही वाढवल्या आहेत. विदर्भात करोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत अधिक आहे. त्यातच चाचण्यांमध्ये गोंधळ होत असल्याचे दिसत आहे.

बुलडाण्यातील मोताळा येथे एका व्यक्तीनं स्वॅब दिलेला नसतानाच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रकार सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे पंडितराव कैलासराव देशमुख 25 फेब्रुवारीला मोताऴा येथील कोविड केअर सेंटरमध्ये गेले होते. याठिकाणी देशमुख यांच्या संपूर्ण माहिती नोंद करण्यात आली. यावेळी त्यांना स्वॅब देण्यासाठी या असं सांगण्यात आलं. मात्र, पंडितराव पुन्हा तिथे गेलेच नाहीत. नंतर 5 मार्च रोजी कोविड सेंटरमधून एका कर्मचाऱ्यानं त्यांना फोन केला आणि तुमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असं सांगितलं. मात्र स्वॅब न देताच अहवाल पॉझिटीव्ह कसाकाय आला, असा प्रश्न पंडितराव यांना पडला.

दरम्यान देशमुख कोविड सेंटरला गेले असता स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाची ट्युब तयार करण्यात आली होती. मात्र स्वॅब न देताच देशमुख माघारी परतले. त्यामुळे त्यांच्या नावाच्या ट्युबमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आता प्रशासन स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.