आतापर्यंत 750 महिलांनी केला संगणकाचा वापर :मोबाइल, इंटरनेट हाताळण्यात बनल्या महिला स्मार्ट
बिबवेवाडी – गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे झोपडपट्टीमधील महिला डिजिटल संगणक साक्षरतेचे धडे घेत आहेत. दोन वर्षे या उपक्रमाला सुरुवात करून आतापर्यंत साडेसातशे महिलांनी या डिजिटल संगणकाचा वापर करून आपले राहणीमान दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गृहपयोगी वस्तूंपासून ते शॉपिंगमॉलमधील इलेक्ट्रिकल वस्तू ई साहित्य, फेसबुक, जी मेल, व्हाट्सऍपच्या माध्यमातून तसेच सुगी, झोमाटो वापर करून महिला स्मार्ट होत आहेत. झोपडपट्टी महिला आज संगणक साक्षरता योग्य वापर करून आज ओला कॅब, पीएमटी सेवा वापर करीत आहेत. तसेच सुशिक्षित होत आहेत. ज्या महिलांना संगणक माहीत नाही, मोबाइल माहीत नाही अशा महिला स्मार्ट मोबाइल वापरून करून महिला स्मार्ट होत आहेत.
स्मार्ट फोनचा वापर करीत इंटरनेटद्वारे सुगी, झोमोटोचा वापर करीत खाद्यपदार्थही वस्तीमध्ये नागरिक मागवत आहेत. तसेच ऑनलाइन शॉपिंग करून उच्च दर्जाचे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर साहित्य मागवून आपले राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न झोपडपट्टीतील नागरिक करीत आहेत. महिलांना साक्षर करण्याचा प्रयत्न असून डिजिटल व्यवहार वाढविण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकही दिले जात आहे.
नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून इंदिरानगर गुलटेकडी मीनाताई ठाकरे झोपडपट्टीमध्ये दोन वर्षांपूर्वी संगणक साक्षरता उपक्रम राबवण्यात आला. याचा अनेक महिलांनी लाभ घेत प्रशिक्षण पूर्ण केले आणि आपला राहणीमानाचा दर्जा उंचावत आहेत. यामुळे या वस्तीमधील भागाचा आम्हा सर्व नागरिकांना अभिमान वाटत आहे.
– गणेश शेरला, सामाजिक कार्यकर्ते