ब्लॅकहेड्स नाहीसे करण्यासाठी वापरा ‘या’ हटके ट्रिक्स

वातावरणातील प्रदूषणामुळे चेहऱ्यावर सतत त्वचेला घातक घटकांची आवरणे चढत असतात. तसेच त्वचेवरील मृत पेशी देखील चेहऱ्यावर साठत असतात. जर तुम्ही तुमचा चेहरा नियमितपणे एक्सफोलियेट केला नाही, म्हणजे चेहऱ्यावर साठलेली घाण हटविण्याकरिता एखाद्या चांगल्या प्रतीच्या स्क्रबने चेहरा स्वच्छ केला नाही, तर या घाणीचे रूपांतर ब्लॅक हेड्समध्ये होते.

अनेक तरुण, तरुणी ब्लॅकहेड्सनं हैराण आहेत. ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र तुमच्या घरातही अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला नैसर्गिकरित्या या ब्लॅकहेड्सपासून मुक्ती देतील.

शुगर पॅक


साखर, दोन मोठे चमचे मध आणि एका लिंबाचा रस एकत्र करावा. हे मिश्रण कमी आचेवर साखर विरघळेपर्यंत ठेवावे. साखर विरघळल्यानंतर या मिश्रणाची घट्ट पेस्ट तयार होते. या पेस्ट थेंब ग्लिसरीन मिसळावे. पेस्ट थोडी कोमट झाल्यानंतर हलक्या हाताने नाकावर व हनुवटीवर लावावी. वीस मिनिटे ही पेस्ट तशीच राहू देऊन त्यानंतर काढून टाकावी. या पेस्ट मुळे नाकावरील व हनुवटवरील ब्लॅक हेड्स निघून जातील.

मेथीचे दाणे


मेथीचे दाणे पाणी घालून वाटून घ्या. ज्या भागावर ब्लॅकहेड्स आहेत, त्या भागावर लावा. 10 मिनिटांनी सुकल्यानंतर कोमट पाण्यानं धुवा.

मक्याचं पीठ

एक चमचाभर मक्याचं पीठ घ्या  मिश्रण ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आलेत, तिथं हळुवारपणे चोरा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.

हळद

पुदीन्याच्या पानांचा रस आणि हळद पावडर एकत्र करा. ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आहे, त्या ठिकाणी काही मिनिटं लावून ठेवा आणि कोमट पाण्यानं धुवा. पुदीन्यांच्या पानांशिवाय तुम्ही चंदन, हळद आणि दूध वापरून एक जाडसर पेस्ट बनवून याचाही वापर करू शकता.

मध

ज्या भागावर ब्लॅकहेड्स आहेत, त्या भागावर 10 मिनिटं मध लावून ठेवा. कोमट पाण्यानं धुवून टाका.

दालचिनी

मध आणि दालचिनीची पावडर याची पेस्ट बनवा. ज्या भागावर ब्लॅकहेड्स आहेत, तिथं रात्रभर ही पेस्ट लावा आणि सकाळी उठल्यानंतर पाण्यानं धुवा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)