नवी दिल्ली – इसत्रायलने गाझा पट्ट्यातील (gaza) आपल्या लष्करी कारवाईची व्याप्ती वाढवली आहे. तोफा आणि चिलखती वाहनांद्वारे गाझा पट्ट्यात जोरदार मारा केला जाऊ लागला आहे. एकाचवेळी आकाशातून, जमिनीवरून आणि समुद्रातूनही हा हल्ला केला जातो आहे, असे इस्रायलच्या सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. इस्रायलच्या (Israel) सैन्याने शुक्रवारी रात्री गाझा पट्ट्यात घुसून छापे घालून लगेच माघारही घेतली. गाझामधील पॅलेस्टिनी मृतांची संख्या 7,300 च्या वर गेली आहे, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक अल्पवयीन आणि महिला आहेत, असे प्रदेशाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. (Israel war)
इस्रायलच्या सैन्याच्या तुकड्या गाझामधील वाळवंटी प्रदेशातून सीमेकडे सरकत असल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. शुक्रवारी इस्रायलचे सैन्य गाझा भोवती विस्तारत असल्याचे आणि सीमेजवळ हजारोंचे सैन्य जमा असल्याचे प्रवक्त्याने म्हटले होते. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या बोगद्यांवर आणि भूमिगत बंकरवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केली असल्याचेही इस्रायलच्या सैन्य दलाने म्हटले आहे. मात्र रात्री इस्रायलच्या विमानांनी किमान 150 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केली. बॉम्बफेक झालेले बहुतेक बंकर उत्तरेकडील गाझा सिटीच्या खाली आहेत. (marathi news)
बंकर आणि बोगद्यांबरोबर इस्रायलने दूरसंचार यंत्रणांनाही ठिकाणांनाही लक्ष्य केले. यामुळे गाझा पट्ट्यातील संवाद यंत्रणाच ठप्प झाली आहे. यामुळे गाझातील 2.3 दशलक्ष लोकांचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. बॉम्बस्फोटामुळे इंटरनेट, सेल्युलर आणि लॅंडलाइन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या. यामुले इस्रायलच्या हल्ल्यामुले झालेल्या जीवितहानीचा तपशील समजू शकणार नाही आहे. गाझामधील वीज पुरवठा यापूर्वीच तोडला गेला आहे. त्यामुळे गाझाच्या बहुतेक भागामध्ये यापूर्वीच अंधार आहे.
इस्त्रायलकडून गाझा पट्ट्यात हवाई हल्ले केले जात असतानाच हमासकडूनही इस्रायलच्या विविध भागांमध्ये रॉकेटचा मारा सुरू आहे. इस्रायल आणि हमासमध्ये यापूर्वी झालेल्या चार युद्धांमध्ये मिळून इस्रायलमधील मृतांची संख्या 4 हजारांपुढे गेली आहे.
बोगद्यांवरील कारवाई अवघड
गाझामधील पायदळाची मोहिम अवघड असणार आहे, हे इस्रायलचे संरक्षण मंत्री योवार गॅलन्ट यांनी प्रथमच मान्य केले आहे. हमासच्या बोगद्यांचे विस्तीर्ण जाळे उद्वस्त करण्यासाठी बराच वेळ लागेल, इस्रायलने प्रतिकार करणाऱ्या हमासची शक्ती नष्ट केली आहे, त्यामुळे कमी-तीव्रतेच्या लढाईच्या दीर्घ टप्प्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गाझामधील हमासची राजवट आणि इस्रायलला धमकावण्याची त्यांची क्षमता चिरडून टाकणे हा आपला उद्देश असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. परंतु हमासचा पराभव कसा मोजला जाईल आणि आक्रमणाचा शेवट कसा होईल हे अस्पष्ट आहे. हमासवर राज्य करण्याचा त्यांचा इरादा नाही, असे इस्रायलचे म्हणणे आहे.