मुंबई – कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. सध्या हीच कॉमेडियन तिच्या आयुष्यातील एका सुरेख वळणावर आहे. भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. लवकरच त्यांच्या घरी चिमुरड्याचे आगमन होणार आहे.
View this post on Instagram
भारती सिंग येत्या एप्रिल महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतंच भारतीने गरोदरपणातील एक फोटोशूट केलं असून, तिचे हे फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंमध्ये भारतीने सुंदर गाऊन परिधान केला आहे.
View this post on Instagram
त्याच सोबत मोकळे केस, चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य तिच्या लूकला चार चाँद लावत आहे. चाहत्यांनी भारती आणि हर्ष यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत, त्यांचे अभिनंद केले आहेत.